मागासवर्गीय मुला मुलींच्या वसतिगृहांमध्ये विनामुल्य प्रवेश सुरु….

कोल्हापूर : अनुसुचित जाती, जमाती, विजाभज, इमाव, विमाप्र, अंपग व अनाथ या प्रवर्गामधील शालेय विद्यार्थी व इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) तसेच बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका, पद‌वी आणि एम.ए., एम. कॉम, एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) सन 2023-24 मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय व शासकीय वसतिगृहामधून विद्यार्थ्यांना पालकांना विनामुल्य अर्ज विÖतरीत करण्यात येत असल्याचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी कळविले आहे.

सन 2024-25 वर्षाकरीता विद्यालयीन व बिगरव्यावसायिक प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पध्दतीने (मॅन्युअली) असून गरजू विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधित वसतिगृहाचे अधीक्षक यांच्याकडे अर्ज सादर करावेत. शालेय विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत दि. 21 जून 2024 पर्यंत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द केले जाईल.

प्रवेश अर्जाची PDF आवश्यक त्या सर्वांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेष, शैक्षणिक साहित्य, सकाळचा नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण व राहण्याची सोय, गरम पाण्याची सोय, वाय-फाय सुविधा, पिण्यासाठी शुध्द पाणी, विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता, ग्रंथालय, अभ्यासिका, निर्वाह भत्ता, मनोरंजन कक्ष, क्रिडा साहित्य व अत्याधुनिक जीम, सीसीटीव्ही निगराणीत सुरक्षित वातावरण, इ. प्रकारच्या सोयी विनामूल्य उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना वसतिगृहात रिक्त जागेनुसार आरक्षणनिहाय, गुणवत्तेनुसार नियमांच्या अधिन राहून प्रवेश देण्यात येणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर विचारे माळ, बाबर हॉस्पीटल जवळ, कोल्हापूर येथे समक्ष किवा दूरध्वनी क्र. 0231-2651318 वर संपर्क साधावा, असे आवाहनही साळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *