Share Now
Read Time:48 Second
पुष्पा पाटील /इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्तपदी पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली आहे.ओमप्रकाश दिवटे यांची अचानक बदली करण्यात अली असून त्याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यांची बदली राजकीय दबावात झाली असल्याची चर्चा पण जोरदार सुरु आहे.
पल्लवी पाटील यांनी बुधवारी महापालिकेत येऊन पदभार स्वीकारला. पल्लवी पाटील यापूर्वी सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून काम करत होत्या. यांना १३ वर्षाचा प्रशासकीय अनुभव आहे.
Share Now