कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसखाली चिरडून दोन महिलांसह चिमुकलीचा मृत्यू….!

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 44 Second

कोल्हापूर : मुंबईतून कोल्हापूरच्या दिशेनं येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसखाली सापडून दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत आता शाहूपुरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

अधिक मिळालेली माहिती अशी की मुंबईहून कोल्हापूर कडे येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसने मार्केट यार्ड जवळ तिघी जणींना रुळावरून चालत जात असताना जोराची धडक दिली. या धडकेत एक महिला रुळाच्या एका बाजूला तर दुसरी महिला आणि लहान मुलगी रेल्वे रुळाच्या दुसऱ्या बाजूला फेकली गेली. तिघींच्या अंगावरुन रेल्वेचे चाक गेल्यामुळे तिघींच्या जागीच मृत्यू झाला.मृत्यू झालेल्या महिलेमधील एक महिला ४० ते ४५ तर दुसरी २५ ते ३० वयोगटातील आहे. दोघींचाही चेहरा छिन्नविच्छिन्न झाला आहे. त्यांच्यासोबत असणारी लहान मुलगी १० ते १२ वर्षांची असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *