कामगार कल्याण मंडळाच्यावतीने दूर पल्ल्याची धार्मिक सहल मंजूर

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 29 Second

मुंबई : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्रच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटक, सर्व क्षेत्रातील कामगार तसेच गुणवंत कामगारांच्या विविध मागण्यांना अनुसरून, सातत्याने अभ्यासू पाठपुरावा त्यासोबत मंत्रालयीन तसेच प्रशासकीय पातळीवरती सकारात्मक चर्चा सुरू आहेत.अशाच एका विधायक मागणीस अनुसरून, यापूर्वी कामगार कल्याण मंडळाच्यावतीने – “कामगार व कामगार कुटुंबीयांकरीता दूर पल्याची सहल” यामध्ये यापूर्वी – औद्योगिक, भौगोलिक किंवा ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे आदीं. करीता सहलीचे आयोजन करण्यात येत होते.

राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या सातत्यपूर्वक अभ्यासू मागणीच्या व चर्चेच्या अनुषंगाने, यापुढील काळात सदर सहलीमध्ये धार्मिक स्थळांचा देखील समावेश करण्यात आला असलेचे परिपत्रक नुकतेच प्राप्त झाले आहे.याकामी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त सन्मा. रविराज इळवे साहेब यांची दूरदृष्टी व कामगार वर्गाप्रती असलेला जिव्हाळा त्याचबरोबर सर्वच अधिकारी महोदयांनी चर्चे दरम्यान सकारात्मक भूमिका अवलंबिल्यामुळे कामगार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

या सर्वच कार्यामध्ये राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व जिल्हा कार्याध्यक्ष, सर्व विभागीय महिला प्रतिनिधी, सर्व विभागीय सदस्य त्याचबरोबर सातत्याने विविध स्वरूपात सहकार्य करणारे सहकारी आदींचे खूप मोठे योगदान आहे.नक्कीच ज्या उदात्त हेतूने असोसिएशनची स्थापना झाली आहे, त्या माध्यमातून घटनेतील तरतुदीनुसार, समाजातील वंचित व उपेक्षित घटक तसेच विविध विषयांच्या मागणींना अनुसरून नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात यश दिसून येईल व यापुढील काळातही समाजाभिमुख मागण्यांच्या अनुसंगाने सकारात्मक व अभ्यासू मांडणीद्वारे तसेच प्रशासनाबरोबर सौदाहार्य जपत अनेक विषय मार्गी लागतील असे, असे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

यावेळी शिष्टमंडळामध्ये केरबा डावरे, प्रभाकर कांबळे, धनंजय पाटील, देवराव कोंडेकर, चंद्रकांत मोरे, दत्तात्रय शिरोडकर, अशोक जाधव, सुभाष हांडे देशमुख, भरत सकपाळ आदी. प्रतिनिधी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *