जिल्हा नियोजन समितीची शनिवारी सभा..

सांगली :  सांगली : सांगली जिल्हा नियोजन समितीची सभा राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, 22 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

या बैठकीत दि. 10 जानेवारी 2024 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेचे इतिवृत्त व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास मान्यता घेणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी उपयोजनाबाह्य क्षेत्रातील योजना कार्यक्रम) सन 2023-24 अंतर्गत अंतिम सुधारीत तरतुदीस व मार्च 2024 अखेरील खर्चास मान्यता घेणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी उपायोजनाबाह्य क्षेत्रातील योजना कार्यक्रम) सन 2024-25 करिताचे नियोजन आणि अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करणे, अशी या बैठकीची विषयसूची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *