अकरावीची पहिली यादी जाहीर…..

0 0

Share Now

Read Time:5 Minute, 17 Second

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आज समितीने जाहीर केली. यावर्षी विज्ञान आणि वाणिज्य या शाखेसाठी सर्वच कॉलेजमध्ये दोन टक्क्यांनी वाढला आहे. पहिल्या फेरीत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी 21 ते 25 जून 2024 या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत मूळ कागदपत्रसह निवड झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे. अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी दिली आहे.
गुणवत्ता, आरक्षण व प्राधान्यक्रम यांच्या आधारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी कनिष्ठ महाविद्यालयनिहाय www.dydekop.org व ज्युनिअर कॉलेजच्या सूचनाफलकावर प्रसिद्ध केले गेली आहे . निवड यादी ही ऑनलाईन पद्धतीने प्राप्त अर्ज, मंजूर तुकड्या व क्षमतेचा विचार करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता पसंतीक्रम, आरक्षण यानुसार तयार केले आहे.यावर्षी विज्ञान शाखेसाठी 5960 इतकी प्रवेश क्षमता आहे त्यासाठी 6252 इतके अर्ज प्राप्त होते. छाननीनंतर 6131 अर्ज स्वीकृत झाले. त्यापैकी पहिल्या फेरीमध्ये 3844 विद्यार्थ्यांची प्रवेश निवड यादी जाहीर केले आहे. 3844 पैकी 2294 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या क्रमाचे कॉलेज मिळाले आहे तर 495 विद्यार्थ्यांना दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. विज्ञान शाखेसाठी 2113 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही. वाणिज्य शाखेसाठी 1280 इतकी प्रवेश क्षमता आहे यंदा अकराशे पाच इतके अर्ज आले. त्यापैकी छाननीअंती 1092 अर्जांची स्वीकारले होते. पहिल्या फेरीमध्ये वाणिज्य शाखेत 673 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. वाणिज्य शाखेत पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 400 इतकी आहे. दरम्यानंदा वाणिज्य शाखेत एकूण प्रवेश क्षमतेपेक्षा 175 अर्ज कमी आले आहेत.
वाणिज्य आणि विज्ञान शाखेत पहिल्या फेरीमध्ये प्रवेश न मिळालेल्या 2513 विद्यार्थ्यांना पुढील होणाऱ्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश मिळणार आहे याबाबतचा एसएमएस विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर पाठवला आहे. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये बदल करायचा आहे त्यांनी आपला पूर्वीचा अर्ज संकेतस्थळावर लॉगिन करून डिलीट करावा व नवीन अर्ज प्रक्रिया शुल्कास भरावा. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही ऑनलाईन प्रवेश अर्ज भरला नाही ते विद्यार्थी आपला ऑनलाईन अर्ज नव्याने भरू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी भाग एक भरला आहे परंतु भाग दोन भरला नाही अशा विद्यार्थ्यांनी भाग दोन भरून अर्ज सबमिट करावा ज्या विद्यार्थ्यांना अर्ज रिजेक्ट चा मेसेज आला आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या त्रुटींची पूर्तता करून अर्ज सबमिट करावा. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरी अंतर्गत 30 जून ते दोन जुलै 2024 या कालावधीत प्रवेश अर्ज छाननी व निवडण्याची तयारी केली जाईल 3 जुलै रोजी www.dydekop.org या संकेतस्थळावर व शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या सूचना फलकावर सकाळी दहा वाजता निवड यादी प्रसिद्ध केली जाईल 3 जुलै ते 5 जुलै 2024 या कालावधीत निवड यादीतील विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *