दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी जामीन मिळणार होता. परंतु आज ईडीने (ED) केजरीवालांच्या जामिनीच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती . यामुळे सध्या उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती दिली आहे. सुनावणी होईपर्यंत जामिनावर स्थगिती राहील, असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’ चे नेते अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर केजरीवाल तुरुंगातूनच दिल्लीचा कारभार पाहत आहेत . लोकसभा निवडणुक असल्याने निवडणूक प्रचारासाठी २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. मद्य धोरण घोटाळा प्रकरणाच्या तपासाच्या महत्वाच्या टप्प्यावर अरविंद केजरीवाल यांना सोडल्यास तपासावर परिणाम होईल. कारण केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. असं ईडीने हायकोर्टात केलेल्या याचिकेमध्ये म्हंटल आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना तात्पुरता धक्का ईडीने दिला आहे. अरविंद केजरीवाल यांना कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाला आहे.
ARVIND KEJRIWAL BAIL : दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती….

Read Time:1 Minute, 49 Second