पेपर फुटीप्रकरणी सरकारचा मोठा निर्णय….

 मुंबई : शैक्षणिक क्षेत्रात गाजलेलं प्रकरण म्हणजे नीट- युजी प्रकरण. यात नीट एक्साम चा पेपर लीक करण्यात आला होता, असा संशय व्यक्त करण्यात आला आणि सोबतच काही संशयितांना पकडण्यात आले होते. त्यांची अगदी कसून चौकशी सुरु होती. यात दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या चौकशी अंती या परीक्षेसोबत अजून बऱ्याच स्पर्धा परीक्षांचे पेपर त्यांच्या कडून फोडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याच प्रकरणी पुढे काही महत्वपूर्ण धागेदोरे हाती आले होते. त्यासंदर्भात पुढे चौकशी करण्यात आली होती. गुरुवारी, सर्वोच्च न्यायालयाने NEET-UG 2024 च्या पेपरफुटी प्रकरणातील आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या तीन उच्च न्यायालयांमधील कार्यवाहीला स्थगिती दिली. या याचिकांमध्ये पेपर लीक आणि ग्रेस गुण देण्यासह कथित गैरप्रकारांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. न्या. विक्रम नाथ आणि एस.व्ही.एन. भाटी यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने NEET-UGC आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने  दाखल केलेल्या चार हस्तांतरण याचिकांवर नोटीस जारी केली आहे, तसेच अशाच समस्यांसह अन्य ११ याचिकांवरही नोटीस जारी केली आहे. सुप्रीम कोर्टाने या नवीन याचिकांना विद्यमान प्रकरणांसह एकत्रित करून यावर ८ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल तोपर्यंत खंडपीठाने उत्तर मागितले आहे. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टात एकूण १४ याचिकांवर सुनावणी झाली. त्यापैकी विद्यार्थ्यांनी आणि ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेने दाखल केले होते. तर, उर्वरित चार एनटीएने सादर केले होते. त्यांच्या याचिकांमध्ये, एनटीएने NEET परीक्षेशी संबंधित विविध उच्च न्यायालयांमधील सर्व प्रलंबित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *