१ जुलै २०२४ दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर…

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 39 Second

कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविण्याचे घोषित केले आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.

कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आयोगाने सविस्तर सुचना दिल्या असून कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीप्रमाणे आहे.

बीएलओ मार्फत घरोघरी सर्वेक्षण, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण /पुनर्रचना, मतदारयादी/EPIC मधील तफावत दूर करणे, अस्पष्ट, निकृष्ट दर्जाचे फोटो बदलून चांगल्या प्रतीचे फोटो सुनिश्चित करणे आणि मतदार यादीमधील विनिर्देशन आणि मानवेतर प्रतिमा, जेथे आवश्यक असेल तेथे बदल करणे. विभाग/भागांची पुनर्रचना करणे आणि
विभाग/ भाग सीमांच्या प्रस्तावित पुनर्रचनेचे अंतिम रुप देणे आणि मतदान केंद्रांच्या यादीची मान्यता घेणे. कंट्रोल चार्ट अद्यावतीकरण, नमुना 1 ते 8 तयार करणे, 1 जुलै 2024 च्या अर्हता दिनांकावर आधारीत प्रारुप मतदार यादीची तयारी करणे – मंगळवार, ‍दि. 25 जून 2024 ते बुधवार, दि. 24 जुलै 2024

पुनरीक्षण कार्यक्रम –
प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे- गुरुवार, दि. 25 जुलै 2024

प्रारुप मतदार यादीवरील दावे व हरकती स्विकारणे- 25 जुलै 2024 (गुरुवार) ते 9 ऑगस्ट 2024 (शुक्रवार)

विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम- मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडुन निश्चित करण्यावर दावे व हरकती निकाली काढणे,

अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मिळवणे, डेटाबेस अद्ययावत करणे व पुरवणी यादी तयार करणे- 19 ऑगस्ट 2024 (सोमवार) पर्यंत

अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे-20 ऑगस्ट 2024 (मंगळवार) याप्रमाणे आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *