Viral Video Case : अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल…

जावेद देवडी /कोल्हापूर-  कोल्हापूरातील दोन व्यक्तींचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिस स्टेशन मध्ये उमेश भास्कर या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उमेशचा शोध घेत आहेत.

  अधिक मिळालेली माहिती अशी की इंस्टाग्राम वर रिअल्स मधून फेमस असणाऱ्या दोन व्यक्तींची मैत्री होती. दोघांनी एकमेकांच्या सहमतीनं शारीरिक संबंध ठेवले,आणि त्याचं व्हिडिओ शूटिंगही देखील केलेले. हा व्हिडिओ त्या तरुणाच्या मोबाईल मध्ये होता. 4 महिन्यापूर्वीच फिर्यादीच्या मित्रानं नवीन मोबाईल खरेदी केला होता नव्या मोबाईल मध्ये जुन्या मोबाईल मधील डाटा ट्रान्सफर करण्यासाठी त्या तरुणाने उमेश भास्कर यांच्याकडे दोन्ही मोबाईल दिले होते.यावेळी मोबाईल मध्ये प्रायव्हेट व्हिडिओ असल्याचे त्याला समजले उमेशने ते व्हिडिओ स्वतःकडे घेऊन ते दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियात व्हायरल केले. व्हिडिओ व्हायरल होताच शहरात एकच खळबळ उडाली होती.

याची माहिती फिर्यादीच्या मित्राला समजताच त्याने लगेच तिला कॉल करुन घडलेली घटना सांगितली,यानंतर तरुणीने पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री उमेश सुरेश भास्कर याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे अधिक चौकशी शाहूपुरी पोलीस करत असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *