Ind vs Eng: सेमीफायनल साठी क्रिकेटविश्व सज्ज…

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 28 Second

(Ajay Shinge)गयाना : अमेरिका आणि वेस्टइंडीज मध्ये संयुक्तरित्या आयोजित t20 वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात आला असून आज भारत आणि इंग्लंड कट्टर प्रतिस्पर्धी सेमी फायनल मध्ये आमने-सामने आले आहेत. 2022 च्या वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये इंग्लंडने भारताचा एकतर्फी पराभव केला होता याचा बदला आजच्या सामन्यात भारताकडून घेतला जाणार का याची प्रतीक्षा अवघ्या क्रिकेट विश्वाला लागून राहिली आहे. अंतिम सामन्या आधीच क्रिकेट विश्वाला एक रोमहर्षक सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. रोहित शर्माच्या जबरदस्त फॉर्म ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताने चांगला विजय प्राप्त केला. भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून इंग्लंड संघाला सर्वाधिक धोका याच खेळाडू कडून असणार आहे. विराट कोहली सध्या या वर्ल्डकप मध्ये आपल्या खराब फॉर्म मुळे त्याला हवा तसा सुरू गवसला नाही परंतु मोठ्या सामन्यात मोठी खेळी करणे विराट साठी नवीन गोष्ट नाही. त्यामूळे आजच्या सेमीफायनल मध्ये सर्वाधिक लक्ष विराट कोहलीच्या खेळीकडे असणार आहे. भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरणारा जोस बटलर पण सध्या फुल फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे आजचा सामना रोहित शर्मा विरुद्ध जोफ्रा आर्चर तर जोस बटलर विरुद्ध जसप्रीत बुमराह असच रंगणार आहे. 

 आजच्या सेमीफायनल सामन्याची सुरूवात रात्री 8 वाजता होणार आहे. सामन्यावर पावसाचे संकट देखील आहे. जर पाऊस झाला आणि सामना होऊ शकला नाही तर भारत डायरेक्ट फायनल मध्ये एन्ट्री करेल. कारण सुपर 8 फेरीमध्ये भारत ग्रुपमध्ये अव्वल स्थानावर आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *