Share Now
Read Time:45 Second
मुंबई : आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होतं आहे. 14 व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. यंदा लोकसभेला विरोधकांना मिळालेली उभारी पाहता आजपासून सुरू होणारं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकारच्या वतीनं अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल, तर 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल.
Share Now