घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचे तीनच दिवस शिल्लक..

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 0 Second

कोल्हापूर: महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि.1 एप्रिल 2024 ते दि.30 जून 2024 अखेर घरफाळ्याच्या चालू मागणीवर 6 टक्के इतकी सवलत देण्यात येत आहे. या सवलत योजनेमधून आज अखेर 53 हजार 379 एवढ्या मिळकतधारकांनी लाभ घेऊन 22 कोटी 81 लाख 79 हजार 962 रुपये इतकी विक्रमी रक्कम भरुन या योजनेचा लाभ घेतला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागामार्फत सन 2024-25 या कालावधीतील घरफाळ्याची 1,61,564 इतकी बिले जनरेट करुन पोस्ट विभागामार्फत मिळकत धारकांच्या पत्त्यावर पाठविली आहेत. यातील अद्यापही 1,08,185 इतक्या मिळक्तधारकांनी सन 2024-25 या आर्थिक वर्षातील घरफाळा रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे या मिळकतधारकांनी या 6 टक्के सवलत योजनेच्या शिल्लक तीन दिवसामध्ये आपली रक्कम भरुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

या सवलत योजनेसाठी महानगरपालिकेच्या वतीने सुट्टीच्या दिवशीही म्हणजे शनिवारी व रविवार दि.29 व 30 जून 2024 रोजी सकाळी 9:00 ते रात्री 10:00 या कालावधीमध्ये नागरी सुविधा केंद्र सुरु ठेवलेली आहेत. तसेच नागरीकांच्या सोईसाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम व महानगरपालिका संकेत स्थळावरुन सुध्दा ऑनलाईन रक्कम भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *