अवैद्य व्यवसायांचा पाठीराखा असणाऱ्या माजी नगरसेवकावर कारवाई करा…

कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली अवैद्य वैश्या व्यवसाय सुरू असून त्यावर निर्बंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावी, असे निवेदन माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण यांनी शाहूपुरी पोलीसांना दिले आहे.

शाहूपरी परिसरात सुरू असलेल्या या अवैध्य व्यवसायामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून शाहूपुरी प्रभाग क्रमांक 25 पत्की हॉस्पिटल शेजारी अवैध मसाज सेंटरवर दि. 25 जून रोजी छापा टाकून कारवाई केली असता या वेश्या व्यवसायाला माजी नगरसेवकांनी पाठीशी घातले आहे असे तपासात समोर आले, त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने असे व्यवसाय बंद करण्यात येतील, असा इशारा राहुल चव्हाण यांनी दिला आहे.

यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख अभिषेक काशीद, शाहूपुरी विभाग प्रमुख सुजयसिंह संपकाळ, अजय भंडारी, अभिषेक पवार, रघुवेंद्र देवणे, पार्थ राऊत, विपुल भंडारे, राहुल कुमटेकर, संजय परब, राजू मणियार, निखिल चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *