रोटरीचा करवीर भूषण पुरस्कार प्रा. पी एस पाटील यांना प्रदान!

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 11 Second

कोल्हापूर: रोटरी क्लब ऑफ करवीर च्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त, दरवर्षी देण्यात येणारा मानाचा, ‘करवीर भूषण पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. पी.एस.पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला. रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे डीजी रिप्रेझेंटेटिव्ह व डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी एडमिन रो. विक्रांत कदम यांच्या हस्ते व असिस्टंट गव्हर्नर मानसिंग पानसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला. क्लबचे प्रेसिडेंट रो .संजय पाटील, सेक्रेटरी कुशल पटेल, ट्रेझरर रो. नारायण भोई आणि सर्व पास्ट प्रेसिडेंट यांचीही या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती. 

         रोटेरियन्स व त्यांच्या परिवारास मार्गदर्शन करताना, “यशस्वी होण्यासाठी धैर्य, चिकाटी तसेच खडतर परिस्थितीत सुद्धा, आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाची आवश्यकता असते!” असे प्रतिपादन प्रा. पी. एस.पाटील यांनी केले. आपल्या छोट्याशा भाषणामध्ये, आज अखेर त्यांनी केलेल्या आपल्या कारकिर्दीतील अनुभवाचे विशेष अवलोकन केले. यावेळी नीट परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेले सुमित संजय पाटील, पूर्णय पंडित जाधव व एमपीएससी परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या सौ. नम्रता अक्षय भोई यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्लब साठी विशेष योगदान दिलेले पास्ट प्रेसिडेंट, रो. सुभाष आलेकर, रो. संभाजी पाटील रो. दिलीप शेवाळे, रो. हरीश पटेल, रो. निशिकांत नलावडे रो. विशाल जांभळे, रो. दिलीप प्रधाने रो. प्रमोद,चौगुले आणि रो. उदय पाटील यांचा सपत्नीक सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. 

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेसिडेंट संजय पाटील यांनी केले. वर्षभरातील कार्य आणि सामाजिक उपक्रमाचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी असिस्टंट गव्हर्नर रो.मानसिंग पानसकर यांनी क्लब ने यावर्षी केलेल्या विविध समाजोपयोगी कार्याबद्दल विशेष प्रशंसा केली. प्रमुख पाहुणे रो. विक्रांत कदम यांनी रोटरी क्लब ऑफ करवीर ने शिवाजी युनिव्हर्सिटी सोबत केलेल्या डिस्ट्रिक्ट इव्हेंट MUN या सातत्यपूर्ण उपक्रमाची विशेष प्रशंसा केली तसेच डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स मध्ये रोटरी क्लब करवीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल धन्यवाद व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांची ओळख डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. दिलीप शेवाळे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन रो. निशिकांत नलवडे यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता सेक्रेटरी कुशल पटेल यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. यावेळी डाॅ. संदीप पाटील आणि डाॅ. विशाल चोकाककर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *