Share Now
Read Time:1 Minute, 21 Second
मुबई : सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार सतेज पाटील यांनी आंतरराष्ट्रीय व आशियाई स्तरावर पुरस्कारप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या धोरणासंदर्भात विधान परिषदेतील चर्चेदरम्यान, नवीन क्रीडा धोरणामध्ये “गट क” मधील नियुक्तीच्या प्रारूप संदर्भात क्रीडा संघटनांचा आक्षेप आहे. याबाबत खेळाडूंच्याही तीव्र भावना आहेत. हे लक्षात घेऊन शासन निर्णय जाहीर करण्यापूर्वी क्रीडामंत्र्यांनी या आठवड्यात संघटनांसोबत बैठक घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी बोलतांना सतेज पाटील यांनी अशी मागणी केली कि, 2018 मध्ये अर्ज केलेल्या खेळाडूंच्या नियुक्ती अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे नवीन क्रीडा धोरणामध्ये नियुक्तीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी,
Share Now