रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव वाहतूक मार्गात बदल

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 7 Second

सांगली : सांगली ते नांद्रे स्थानकादरम्यान पंचशिलनगर (जुना बुधगाव रोड) येथील रेल्वे गेट LC 129 Km 269/1-2 वरील रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव समाज कल्याण कार्यालय सांगली ते रेल्वे गेट पर्यंतचा मूळ रस्त्याला रेल्वे गेट पर्यंत समांतर रस्ता तयार करून सदर पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. मोटार वाहन कायदा 1988 कलम 115 व 116 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी हे आदेश जारी केले असून वाहतूक सुरक्षा उपाययोजनेव्दारे वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेशही निर्गमित केले आहेत.

जनतेच्या व वाहन चालकाच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे, माहिती लावणे संदर्भातील उपाययोजना अतिरिक्त महाव्यवस्थापक महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई, कार्यकारी अभियंता मध्य रेल्वे, मिरज, पोलीस अधीक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांनी एकत्रितपणे कराव्यात. अतिरिक्त महाव्यवस्थापक महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई व सहा. विभागीय अभियंता मध्य रेल्वे मिरज यांनी रेल्वे गेट LC 129 Km 269/1-2 वरून होणारी वाहतूक वळविण्यात आल्याबाबतची माहिती जनतेला होण्यासाठी ग्रामीण व शहरातील महत्वाच्या सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी याबाबतची अधिसूचना तसेच वाहतुकीसाठी उपलब्ध पर्यायी मार्गाच्या माहितीस पुरेशी प्रसिध्दी द्यावी. तसेच या निर्णयाची तात्काळ व संपूर्ण अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी. सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने RPF / Railway Police कडील अंमलदार यांची नियुक्ती करण्यात यावी. ही अधिसूचना दि. 13 जुलै 2024 रोजीपासून अंमलात येईल, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *