Share Now
Read Time:1 Minute, 11 Second
कोल्हापूर: कुडित्रे फाटा, सांगरूळ फाटा श्रीराम हायस्कूल जुनियर कॉलेज रोड येथे वाहतुकीस अडथळा करून घोळक्याने हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. रोड वर उभे राहून हुल्लडबाजी केल्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे तरुणांवर कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्या पालकांना देखील बोलावून घेऊन समज दिला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस हवालदार प्रमोद पाटील, दत्तात्रय बांगर, सुनील देसाई, पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय पाटील, अक्षय पवार यांनी केली. भागातील नागरिकांतून या कारवाईचे कौतुक केलं जात आहे.
Share Now