सांगली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, इस्लामपूर (कोरे नगर जवळील भाग इस्लामपूर) येथे सन 2024-2025 करीता राज्यातील अनु. जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विजाभज (VJNT), इतर मागासवर्गीय (OBC), विशेष मागासवर्गीय (SBC), आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (EBC), अनाथ (Orphan) व अपंग (Handicap) या सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना रिक्त जागेवर विनामुल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातून अर्ज घेऊन विहीत नमुन्यातील अर्ज शैक्षणिक कागदपत्रासोबत वसतिगृहात जमा करावा, असे आवाहन वसतिगृहाचे अधिक्षक धनाजी चौगुले यांनी केले आहे.
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इस्लामपूर-वाळवा तालूका जवळील शाळा व महाविद्यालयात इयत्ता 8 वी, 9 वी, 10 वी, 11 वी, प्रथम वर्ष डिप्लोमा / आयटीआय, प्रथम वर्ष बी.ए /बी.कॉम / बी.एससी/अभियांत्रीकी पदवी/ इतर पदवी कोर्सेस, प्रथम वर्ष कोणतीही उच्च पदवी व प्रथम वर्ष पदवीकाचे नियमित शिक्षण घेत असलेल्या बाहेरगांवाकडील/परगांवा वरुन ये-जा करणाऱ्या/ (इस्लामपूर स्थानिक विद्यार्थी सोडून) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन सुरू आहे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 45 टक्केपेक्षा जास्त गुण आणि उत्पन्न मर्यादा 2 लाख 50 हजार रूपये पेक्षा कमी व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 55 टक्के पेक्षा जास्त गुण आणि उत्पन्न मर्यादा एक लाख पेक्षा कमी आवश्यक आहे.
बाबनिहाय ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करण्याचा कालावधी व कंसात निवड यादी प्रसिध्द दिनांक पुढीलप्रमाणे. शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करण्याचा कालावधी 10 जुलै 2024 असून निवड यादी प्रसिध्द दिनांक 12 जुलै 2024 आहे. इयत्ता 10 वी व इयत्ता 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी (व्यवसायीक अभ्यासक्रम वगळून) तसेच बी.ए/बी.कॉम/बी.एस.सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका/पदवीका व एम.ए/ एम.कॉम / एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यवसायीक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करण्याचा कालावधी 31 जुलै 2024 असून निवड यादी प्रसिध्द दिनांक 5 ऑगस्ट 2024 आहे.
प्रवेश फॉर्म सोबत मागील वर्षाची पास गुणपत्रिका झेरॉक्स, जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स, वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसिलदार यांच्या स्वाक्षरीचे), चालू प्रवेशीत वर्षाचा चालू महिन्यातील दिनांकाचे कॉलेजचा बोनाफाईड मुळ प्रत, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र (डोमिसाईल प्रमाणपत्र) (तहसिलदार यांच्या स्वाक्षरीचे) झेरॉक्स या कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे चौगुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.