Share Now
Read Time:1 Minute, 20 Second
खासदार धनंजय महाडिक
विधान परिषद निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे महायुतीने निर्विवाद आणि घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीचा स्पष्ट कौल दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचे नॅरेटिव्ह सेट केले, आणि लोकांची दिशाभूल केली.
त्यामुळे हवेत गेलेल्या महाविकास आघाडीला या निवडणुकीने पुन्हा जमिनीवर आणले आहे.
विकासाची भूमिका आणि सकारात्मक विचार यातून आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीला पूर्ण स्पष्ट बहुमत मिळेल, याची खात्री आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, हे या निवडणुकीने स्पष्ट केले आहे. विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा..
Share Now