सांगली जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट …?

सांगली कौतुक नागवेकर – सांगली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुरूवारी मध्यरात्रीनंतर ‘ऑल आऊट ऑपरेशन’राबवले या मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासले. ८ आरोपी आणि फरारी ८ आरोपी पकडण्यात आले. दोन हद्दपार आरोपींवर कारवाई केली. तसेच १५१ वाहनांवर कारवाई करून एक लाख ४० हजार रूपये दंड वसूल केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागा मार्फत ही कारवाई करण्यात आली.

  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीमध्ये गुरूवारी मध्यरात्रीनंतर कोम्बिंग आणि ऑल आऊट ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरूवारी रात्री ११ वाजता नाकाबंदी, कोम्बिंग आणि ऑल आऊट ऑपरेशनला सुरूवात झाली. शुक्रवारी पहाटे तीन पर्यंत ही कारवाई सुरू होती.

या कारवाई दरम्यान फरारी आरोपी, अजामिनपात्र वॉरंट, हद्दपार आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत सर्व उपअधीक्षक, २५ पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांची पथके सहभागी झाली होती. रेकॉर्डवरील ८६ आरोपींची तपासणी केली. हद्दपारीचा भंग केलेल्या दोघांवर कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *