युवकांमध्ये एड्स जनजागृतीसाठी सांगलीत रेड रन मॅरेथॉन स्पर्धा संपन्न..

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 21 Second

सांगली : आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून 12 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने युवकांच्या मध्ये एच.आय.व्ही. एड्स विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आज सांगली येथे रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरावडेकर व रोटरी क्लच अध्यक्ष मनिष मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून सुरूवात होवून विश्रामबाग चौक- सांगली मार्केट यार्ड -पुष्कराज चौक – मार्गे सिव्हील हॉस्पीटल येथे सांगता झाली. या स्पर्धेकरीता जिल्ह्यातील कार्यरत 9 रेड रिबन क्लब कार्यान्वीत असणाऱ्या महाविद्यालयांना तसेच जिल्ह्यातील इतर महाविद्यालयांना निमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेचे नियोजन हे सांगली जिल्हा ॲम्युचुअर ॲथलेटिक असोसिएशन यांच्या सहकार्यालने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सांगली कार्यालयाकडून करण्यात आले.

रेड रन मॅरेथॉन स्पर्धेकरीता आदर्श कॉलेज विटा, आर. आर. पाटील कॉलेज सावळज, म्हैशाळ कॉलेज म्हैशाळ यांचे प्राध्यापक वर्ग तसेच गुलाबराव पाटील कॉलेज मिरज, यशवंतराव चव्हाण कॉलेज व कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर, डॉ. बापुजी साळुंखे कॉलेज मिरज, बळवंत कॉलेज विटा सहभागी झाले होते. तसेच ही स्पर्धा सुरळीत पार पाडण्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, आयसीटीसी, गुप्तरोग विभाग, एआरटी कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले.
रेड रन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बाबासो अनिल कुडलापघोळ (डॉ. बापुजी साळुंखे कॉलेज मिरज), व्दितीय क्रमांक अनिकेत कुडलापघोळ (डॉ. बापुजी साळुंखे कॉलेज मिरज), तृतीय क्रमांक हर्षवर्धन कृष्णात पाटील (कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर) यांनी पटकावला. मुलींमध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा भारत सोनवणे (बळवंत कॉलेज विटा), व्दितीय क्रमांक उषा तुकाराम चव्हाण (मा. आर.आर. पाटील कॉलेज सावळज), तृतीय क्रमाक प्रतिक्षा भारत सोनवणे (आदर्श कॉलेज विटा) यांनी पटकवला.

या स्पर्धेचे बक्षिस वितरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर, मनिष मराठे व पदाधिकारी यांच्या हस्ते सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा ॲम्युचुअर ॲथलेटिक असोसिएशनचे पदाधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ उपस्थित होते. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त मुले व मुली राज्यस्तरीय रेड रन मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र झाली असून ही स्पर्धा ठाणे येथे होणार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *