अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करा

कोल्हापूर, दि. 22 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थी, विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी २६ जुलै २०२४ पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ताराराणी पुतळ्या जवळ, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा पोष्टाव्दारे अर्ज सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडाळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी हस्तलिखित अर्ज, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याची मार्कलिस्ट, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती, रेशनकार्ड, व आधारकार्ड इ. कागदपत्रे सादर करावीत. दिलेल्या मुदतीनतंर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *