Share Now
कोल्हापूर, दि. २३ : मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे विभागीय आयुक्त दि. २५ जुलै २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता श्री शाहुजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, प्रतिनिधी यांची बैठक घेणार आहेत. याबाबत काही सूचना असल्यास उद्या दि. २४ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत dydcokolhapur@gmail.com या ई-मेल वर पाठवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दि. १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (दुसरा) कार्यक्रम घोषित केला आहे. त्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांना पुणे विभागातील ५ जिल्ह्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
Share Now