कामगार हितासाठी अविरतपणे झगडणारी “भारतीय मजूर संघ” हि पहिल्या क्रमांकाची संघटना.! अशोक निकम रायगड जिल्हा सचिव

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 38 Second

रोहा (दिपक भगत):-दिनांक २३ जुलै रोजी भारतीय मजदूर संघाच्या वतीने ६९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कामगार हितासाठी अविरतपणे प्रयत्नशील असणार्या या संघटनेने नुकताच ६९ व्या वर्षाचा टप्पा पार केला आहे. सलग ६९ व्या वर्ष कामगार हितासाठी काम करणे हे आव्हानात्मक म्हणावे लागेल. देशात यापूर्वी अनेक चळवळी उभ्या राहिल्या, कामगार संघटना उभ्या राहिल्या परंतु कालांतराने त्यांच्यात मतभेद होऊन त्या संघटना,चळवळी विखुरल्या गेल्या, विभक्त झाल्या अपवाद फक्त भारतीय मजदूर संघ या कामगार संघटनेचा म्हणावा लागेल. कामगारांच्या हितासाठी ही संघटना काल देखील अखंड होती,आज देखील अखंड आहे आणि येणाऱ्या काळात देखील अखंड राहील.आज धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये भारतीय मजदूर संघाचे अनेक युनिट स्थापन झालेले आहेत. स्टाफ कामगारांना संघटना करण्याचा हक्क नाही असं म्हणणारे औद्योगिक प्रशासनाला भारतीय मजदूर संघांनी वेळोवेळी आपल्या शैलीत समजावलेल आहे.आज असंख्य कामगार या संघटनेच्या छत्रछायेखाली सुरक्षित असून समाधानी आहेत.
धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये आज भारतीय मजदूर संघाच्या अनेक युनिट असून ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय मजदूर संघाच्या वतीने कंपनीतील कामगारांच्यावतीने भारतीय मजदूर संघाच्या फलकाचे पूजन करण्यात आले.७० व्या वर्षात पदार्पण करीत असल्याच्या निमित्ताने संघटनेच्या वतीने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.औद्योगिक वसाहतीमध्ये रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन (आर.आय.ए) येथे ६९ व्या दिनाचे औचित्य साधून मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला उपस्थित रमेश गोरिवले माजी प्रदेश उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ, ऍड.बाळासाहेब कांबळे कोषाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भारतीय मजूर संघ,अशोक निकम रायगड जिल्हा सचिव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना अशोक निकम म्हणाले की,येत्या काळात भारतीय मजदूर संघाच्या अनेक शाखा धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये दिसतील. या कार्यक्रमाला श्रीमती निर्मला भुतकर, भारतीय मजूर संघाचे अजित तलाठी,संदीप मगर कोषाध्यक्ष रायगड जिल्हा,वैभव घाणेकर रोहा तालुकाध्यक्ष व कामगार वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *