टेलीमानस सेवांमध्ये कोल्हापूर राज्यात प्रथम; मानसिक समस्यांवरील मोफत सल्ल्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

कोल्हापूर, दि. 30  : कोल्हापूर जिल्हा टेलिमानस सेवांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. आरोग्य विभागाच्या टेलिमानस विभागाच्या 14416/ 18008914416 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास मानसिक समस्यांवर मोफत समुपदेशन करुन सल्ला दिला जातो. मानसिक समस्या असलेल्या व्यक्तींनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सेवा रुग्णालय मानसोपचार तज्ञ डॉ. अर्पणा कुलकर्णी यांनी केले आहे.

टोल फ्री क्रमांकावर रोज सरासरी 90 कॉल येत असून दोन महिन्यात 5 हजार 284 जणांचे समुपदेशन करण्यात आले आहे. ज्यांना चिंता, भिती, काळजी, वारंवार तेच विचार व एक कृती वारंवार करणे, संशय येणे, सतत भास होणे, नैराश्य, उदासीनता, आत्महत्येचे विचार येणे, व्यसन, झोपे संबंधित समस्या, मुलांच्या मानसिक समस्या (अति मोबाईलचा वापर, रागीटपणा, गेमींग) इ. समस्या असलेल्या रुग्णांनी वरील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास त्याला मोफत मार्गदर्शन करण्यात येते. ओपीडी सोमवार, बुधवार व शनिवारी असून अधिक माहितीसाठी मानसोपचार विभाग, सेवा रुग्णालय, कसबा बावडा येथे संपर्क साधावा.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *