शिवसेनेच्या वतीने सीपीआर मध्ये जनता दरबार….

कोल्हापूर/रहीम पिंजारी : जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिव आरोग्य सेना यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय CPR येथे आज जनता दरबार भरवण्यात आला या वेळी रुग्णालयातील सर्व वॉर्ड मध्ये जावून तेथील सुविधांचा आढावा घेतला व तेथील कर्मचारी वर्गाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्याबद्दल तेथील डीन साहेबांशी बोलणं केलं यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार,शिव आरोग्य सेनेचे राज्य कार्याध्यक्ष किशोर ठाणेकर,शिवसेना सह संपर्कप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले , महिला जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तुरे, शिवसेना शहर समन्वयक विशाल देवकुळे, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख दिनेश परमार, महिला शहर संघटक रीमा देशपांडे, युवती सेना शहर संघटक माधुरी दळवी, अवजड वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, अपंग सेनेचे शहर प्रमुख सुहास डोंगरे हे उपस्थित होते ह्या उपक्रमा साठी शिव आरोग्य सेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक विकी मोहिते, सह सचिव गोविंद वाघमारे, शहर समन्वयक विराज ओतारी, जिल्हा सह समन्वयक अमित पई, शहर सह समन्वयक रितेश पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *