महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना  ‘अग्निशमन सेवा पदक’  तर पाच कर्मचाऱ्यांना ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 0 Second

नवी दिल्ली : 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त, केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 11 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती शौर्य पदक’ उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवानागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना जाहीर केली जातात. वर्ष 2024 साठी 59 जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 6 अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल एक जवान – संतोष श्रीधर वॉरिकमुख्य अग्निशमन अधिकारी यांना ‘विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीं पदक तर पाच जवानांना ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान करण्यात आला.

देशभरातील उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’4 कर्मचाऱ्यांनाउल्लेखनीय सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि 55 कर्मचार्यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा कामगिरीसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील 6 अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

देशातील 14 कर्मचाऱ्यांना नागरी संरक्षण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘‘नागरी संरक्षण पदक’ तसेच उल्लेखनीय सेवेसाठी ‘ ‘नागरी संरक्षण पदक’ अनुक्रमे 03 कर्मचारी / स्वयंसेवक आणि 11 कर्मचारी/ स्वयंसेवकांना पदक प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान झाली.

राज्यातील ‘अग्निशमन सेवा पदके’ आणि  ‘नागरी संरक्षण पदक’ प्राप्त अधिका-यांची नावे-

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम) अग्निसेवा पदक – श्री संतोष श्रीधर वॉरिकमुख्य अग्निशमन अधिकारी यांना प्रदान करण्यात आला.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम) अग्निसेवा पदक

किशोर ज्ञानदेव घाडीगावकरविभागीय अग्निशमन अधिकारी, अनंत भिवाजी धोत्रेउप अधिकारी, मोहन वासुदेव तोस्करआघाडीचे फायरमनमुकेश केशव काटेलीडिंग फायरमन आणि किरण रजनीकांत हत्यालअग्निशमन अधिकारी यांचा समावेश आहे.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम)- नागरी संरक्षण पदक अशोक बोवाजी ओलंबाहवालदार यांना प्रदान करण्यात आले आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)– )- नागरी संरक्षण पदक

 नितीन भालचंद्र वयचलप्राचार्य, शिवाजी पांडुरंग जाधवजेलर ग्रुप-1, दीपक सूर्याजी सावंतसुभेदार आणि जनार्दन गोविंद वाघहवालदार यांचा समावेश आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *