उचगांव येथील एनआयटी कोल्हापूरच्या प्रोजेक्टला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिक महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्पाचे यश

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 29 Second

 

कोल्हापूर/,प्रतिनिधी :  प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील एनआयटी कोल्हापूरच्या डिप्लोमा विंगमधील एआय विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या एआय बेस्ड व्हीलचेअर फाॅर हॅन्डीकॅप्ड पर्सन प्रोजेक्टला इलेक्ट्राॅनिक्स विंग्ज या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रोजेक्ट स्पर्धेत पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत ११० देशांतील इंटरनेट ऑफ थिंग्ज, कन्ट्रोल ॲन्ड ऑटोमेशन, रोबोटिक्स, मशीन लर्निंग ॲन्ड एआय, हेल्थ ॲन्ड मेडिकल टेक्नाॅलाॅजी आणि सोशल इम्पॅक्ट ॲन्ड ॲग्रीकल्चर या सदरांतील एकूण ४२२ प्रोजेक्ट्स घेवून १०६९ विद्यार्थी, प्राध्यापक, व्यावसायिक, अभियंते, तंत्रज्ञ, संशोधक, यू ट्युबर्स, हार्डवेअर डेव्हलपर्स, रोबोटिक्स क्लब आणि हौशी रचनाकार सहभागी झाले होते. एप्रिल ते ऑगस्ट २०२४ दरम्यान झालेल्या या स्पर्धेत प्रोजेक्टचे सादरीकरण ऑनलाईन पद्धतीने काटेकोरपणे घेण्यात आले. ४२२ प्रोजेक्टपैकी १६० प्रोजेक्ट्सची नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट म्हणून निवड करण्यात आली जे जनहितार्थ वापरण्यासाठी जागतिक पटलावर खुले झाले आहेत. अशी माहिती एनआयटी कोल्हापूरचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी दिली. वरील प्रोजेक्टसोबतच एनआयटी कोल्हापूरच्या हेड कन्ट्रोल्ड माऊस कर्सर विथ व्हाॅईस कमान्ड्स फाॅर हॅन्डीकॅप्ड पर्सन याही प्रोजेक्टने या १६० नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्समध्ये स्थान पटकावले. यामधून अंतिम १५ प्रोजेक्ट्सची पारितोषिकासाठी निवड झाली, ज्यामध्ये एआय बेस्ड व्हीलचेअरचा समावेश आहे. या १५ प्रोजेक्ट्सना एकूण रू. ५ लाखांचे पारितोषिक मिळाले. अशी उत्तुंग कामगिरी करणारी एनआयटी कोल्हापूर ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था ठरली. संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी प्रोजेक्ट मार्गदर्शक प्रा. अश्विनकुमार व्हरांबळे, विभागप्रमुख प्रा. विक्रम गवळी यांच्यासोबत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पारस कवितकर, पार्थ सुर्यवंशी, हर्ष सुतार, विवान कानिटकर या विद्यार्थ्यांनी हे पारितोषिक पटकावले. तर पार्थ मिरजकर, श्रेयस सांगवे, रेहान सय्यद व अर्श फरास यांच्या प्रोजेक्टची अंतिम १६० प्रोजेक्टमध्ये निवड झाली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *