श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई श्रीदेवी चरणी नाव जाहीर न करणेच्या अटीवर एका भक्ताने दान स्वरुपात सोमवार दि. ३०/०८/२०२४ रोजी अंदाजे ७११.०० मिलीग्रॅम (७१ तोळे १०० ग्रॅम) वजनाचा अंदाजे किंमत रु. ५०,३३,१६८/- चा सुवर्ण सिंह (सोन्याचा सिंह) श्रींचे चरणी अर्पण केला.
यावेळी देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर तर्फे प्रशासक तथा जिल्हाधिकारी मा. श्री. अमोल येडगेसाो, मा. सचिव श्री. शिवराज नाईकवाडे, मा. व्यवस्थापक श्री. महादेव दिंडे,व पुजारी उपस्थित होते.


