अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज वितरणामध्ये केडीसीसी बँक अग्रणी आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये युवकांना रोजगार निर्मितीसाठी कर्ज मंजुरीपत्र वितरण कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने होते.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच बेरोजगार तरुण-तरुणंच्या हाताला रोजगार देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्यासाठी बँक नेहमीच कार्यरत आहे. बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तरुण-तरुणींनी रोजगार निर्मितीमधून आर्थिक सक्षम व्हावे.
यावेळी नानासाहेब पांडुरंग पाटील- बेलवळे बुद्रुक, संजय शिवाजी जाधव- गोरंबे, वैभव चंद्रकांत पाटील – व्हनाळी, रघुनाथ जगन्नाथ पाटील- बेलवळे खुर्द, दीपक मधुकर पाटील- यमगे, बाळासाहेब केशव बोंगार्डे-बानगे, रवींद्र तुकाराम पाटील- पिंपळगाव बुद्रुक, सुभाष जयसिंग चौगुले व जयसिंग गणपती चौगुले -साके, संभाजी ईश्वरा चौगुले व ईश्वरा हरी चौगुले -बिद्री, रणजीत बंडा पाटील- बेलवळे खुर्द, नवनीत तानाजी व्हन्नूरे व सत्यजित तानाजी व्हन्नूरे- लिंगनूर दुमाला यांना नवीन व्यवसाय व उद्योग धंद्यातून रोजगार निर्मितीसाठी केडीसीसी बँकेने अर्थसहाय्य केले. त्या मंजुरीपत्रांचे वाटप मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.
दिव्यांग युवकालाही रोजगार निर्मितीसाठी अर्थसहाय्य…..!
संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, मराठा समाजातील बेरोजगार तरुण तरुणींच्या हाताला रोजगार देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली आहे. त्याअंतर्गत मराठा समाजातील युवकांच्या रोजगार निर्मितीसाठी केडीसीसी बँक नेहमीच अग्रभागी आहे. तसेच; या महामंडळाच्यावतीने बेलवळे बुद्रुक ता. कागल नानासाहेब पाटील या दिव्यांग युवकालाही रोजगार निर्मितीसाठी बँकेने अर्थसहाय्य केले आहे. मराठा समाजासह सर्वच समाजांच्या रोजगार निर्मितीतून आर्थिक उन्नतीसाठी बँक सदैव कटिबंध आहे.
यावेळी कागलचे माजी नगराध्यक्ष नवल बोते, कोल्हापूर जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष नितीन दिंडे आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. आभार विभागीय अधिकारी शंकरराव निंबाळकर यांनी मानले.