रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने आयोजित यामिनी प्रदर्शन महिलांसाठी उत्कृष्ट,प्रदर्शनास नेहमीच सहकार्य राहील – आमदार जयश्री जाधव 

0 0

Share Now

Read Time:6 Minute, 16 Second

सह, संपादक : कोमल शिवाजी शिंगे 

 दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने यावर्षीही अकरावे प्रदर्शन 20,21 व 22 सप्टेंबर 2024 रोजी विक्टोरिया हॉल, सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे आयोजित केले आहे.या प्रदर्शनास आजपासून सुरुवात झाली असून या प्रदर्शनाचे रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन श्री गिरीश जोशी यांच्या उपस्थितीत आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना आमदार जाधव यांनी रोटरी क्लब ऑफ़  

गार्गीजच्या यामीनी प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे. यातून महिलांसाठी नवी उभारी मिळणार असल्याचे उद्गार काढले. महिला आता सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत मात्र त्यांची सुरक्षितता अजूनही समाजात नाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी महिलांनी पुढे आले पाहिजे असेही उद्गार काढून या प्रदर्शनास माझे नेहमीच सहकार्य राहील असे उदघाटन प्रसंगी बोलून दाखविले.

यावेळी बोलताना रो. श्री गिरीश जोशी यांनी दरवर्षी भरविण्यात येणारे यामिनी प्रदर्शन उत्कृष्ट व चांगले असते यातुन जमा होणाऱ्या निधीचा उपयोग रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने समाज कार्यासाठी केला जातो. प्रदर्शन उत्कृष्ट भरविल्याबद्दल गार्गीजच्या सर्व पदाधिकारी महिलांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या माजी अध्यक्षा व सेक्रेटरी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर क्लबच्या अध्यक्षा रो. कल्पना घाटगे,अजय मेनन, सेक्रेटरी रो. शोभा तावडे ट्रेझरर रो. ममता झंवर याचबरोबर यामिनीच्या प्रमुख समन्वयक रो. रेणुका सप्रे, रो. आरती पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यामिनी प्रदर्शनाचे हे अकरावे यशस्वी वर्ष आहे. यावर्षी प्रदर्शनात 100 हून अधिक स्टॉल आहेत. यात साड्या, ड्रेस मटेरियल, रेडमेड ड्रेसेस, ज्वेलरी, फुटवेअर, डिझायनर पंजाबी चपला, कास्टाईलची भांडी,होम डेकोर आयटम आणि बचत गटांचा स्टॉल ज्यामध्ये मतिमंद मुलांनी तयार केलेली पणती,ट्रे, पेंटिंग आहेत.ड्रेसेस, साड्या, लहान मुलांचे कपडे, ज्वेलरी, डेकोरेटिव्ह वस्तू, स्किन केअर प्रॉडक्ट याबरोबरच रियल ज्वेलरी व डायरेक्ट विणकारांकडून बनारसी व चंदेरी साड्या यांचा यात समावेश आहे. समाजातील विविध घटकांपर्यंत

कोल्हापूर, सांगली इचलकरंजी याबरोबरच दिल्ली बनारस गोवा मुंबई पुणे बेळगाव आणि इतर विविध शहरातून स्टॉल धारक आलेले आहेत त्यांनी आपले स्टॉल मांडले आहेत.समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद देणे हा मुख्य उद्देश या प्रदर्शनाचा असून त्यामुळे मतिमंद मुलांनी बनवलेल्या विविध वस्तू आपल्याला प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत.

या प्रदर्शनातून उपलब्ध निधीतून हॅपी स्कूल करिता विविध उपक्रम, महिला सबलीकरण, गरजूंसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मुर्तीसाठी सर्वाइकल कॅन्सरचे वैक्सिंग, अशा विविध उपक्रमासाठी वापरला जाणार आहे.

 रो. दीपिका कुंभोजकर,रो.सुजाता रोहिया, रो प्रीती मर्दा, रो प्रीती मंत्री, गिरीजा कुलकर्णी, रो.मेघना शेळके, रो. योगिनी कुलकर्णी,रो.लक्ष्मी शिरगावकर,रो.सुप्रिया डोईजड व रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

प्रदर्शन उद्या 21 व 22 सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. तरी सर्व कोल्हापूरवासीयांनी या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

यावेळी क्लबच्या अध्यक्षा रो. योगिनी कुलकर्णी आभार सेक्रेटरी रो.लक्ष्मी शिरगावकर,

यांनी मानले.यावेळी ट्रेजरर रो. आरती पवार,रो.सौ साधना घाटगे,को.चेयर रो.हेमलता कोटक,रो.कल्पना घाटगे, रो. शोभा तावडे, रो. ममता झंवर याचबरोबर यामिनीच्या सदस्य रो. रेणुका सप्रे, रो. दीपिका कुंभोजकर,रो प्रीती मर्दा, रो प्रीती मंत्री,रो. गिरीजा कुलकर्णी, रो.मेघना शेळके त्याचबरोबर सर्व क्लब सदस्य उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *