कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजयी उमेदवार राजेश क्षीरसागर यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजयी उमेदवार म्हणून कोण निवडून येणार याकडे सर्वच जिल्ह्यातील उमेदवाराबरोबर कोल्हापूरवाशीयांचे लक्ष लागून होते.

सुरुवातीच्या मतमोजणी बरोबरच राजेश लाटकर यांचे नाव आघाडीवर होते ११ फेऱ्यापर्यंत राजेश लाटकर यांचेच नाव आघाडीवर होते. 

Advertisements

तदनंतर मात्र शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी लाटकर यांचे लीड तोडत स्वतः आघाडी घेत विजय उमेदवार म्हणून घोषित झाले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज धान्य गोडाऊन रमणमळा येथील सभागृहात शांततेत व सुरळीत पार पडली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्री.राजेश क्षीरसागर यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संपत खिलारी यांच्या हस्ते विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले..

यावेळी भाजपाचे महेश जाधव भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव राष्ट्रवादीचे आदिल फरास निवडणूक निरीक्षक,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *