निवडणुक निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून नाना पुन्हा जनतेत..

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 31 Second

media control news network 

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी गेले २.५ वर्ष तयारी करत असताना जनतेत उतरून निवडणुकीसाठी तयारी केली असताना महायुतीच्या जागा वाटपामुळे ही जागा शिवसेनेला गेली आणि याठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली. राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाल्या नंतर त्यांनी नाराज न होता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार स्वतः उमेदवार असल्या प्रमाणे त्यांनी प्रचार यंत्रणा राबवत राजेश क्षीरसागर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला . त्यासाठी स्वतः शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे , श्रीकांत शिंदे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दूरध्वनीवरून सत्यजित कदम यांचे अभिनंदन केले. 

निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून नाना पुन्हा जनतेत..

२३ नोव्हेंबर ला निकाल लागल्यानंतर २४ तारखेला सत्यजीत कदम यांनी सुरू असलेल्या कामांची स्वतः पाहणी केली तर ज्या लोकांना प्रचार काळात काम करायचं आश्वासन दिले होते त्या ठिकाणी प्रत्यक्षात संबधित अधिकारी वर्गाला घेवून पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. 

यावेळी त्यांनी शहरातील नवीन कामांचा शुभारंभ, चालू कामांची पाहणी आणि भविष्यात करायची काम यात ते व्यस्त असून त्याचबरोबर कोल्हापूर शहर आणि परिसरातील सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होऊन आपल्या जनसंपर्काचा धडाका कायम ठेवला आहे . 

कोल्हापूर शहरातील बहुप्रतीक्षित अशा कोल्हापूर शहराच्या रिंग रोडच्या कामासाठी ३.५० कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ केला तर मोरेवाडी ते एसएससी बोर्ड रोडच्या कामासाठी रवींद्र चव्हाण यांच्याकडून १२.५० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळवली असून त्याठिकाणी यूटिलिटी , हेरिटेज स्ट्रीट लॅम्प आणि काँक्रेट आणि डांबरी रस्त्याच्या माध्यमातून रस्त्याच्या कायापालट करण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष जातीने हजर राहून स्थानिक नागरिक आणि अधिकारी यांच्या माध्यमातून परिपूर्ण असा आराखडा तयार केला. 

या कामात त्यांना दक्षिणचे आमदार अमल महाडीक आणि उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांची साथ मिळत असून जनतेतून मिळणारा प्रतिसाद हा अविश्वसनीय आहे .

—————————- जाहिरात ——————————

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *