कोल्हापूर प्रतिनिधी, गडहिंग्लज प्रांत अधिकारी शेळके यांना निवेदन…
आज गडहिंग्लज तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या परप्रांतीय’ नराधमाला कठोर शिक्षा होण्यासाठी सुर उमटला..
गडहिंग्लज प्रांत अधिकाऱ्याला भेटून आम्ही समस्त गडहिंग्लजकर आपणास निवेदन करीत आहोत की येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर परप्रांतीय युवकाकडून अत्याचार झाला आहे. त्या नराधामाला गडहिंग्लज पोलीसांनी ‘अटक केली आहे. जलदगती में कोर्टात खटला चालवण्यात यावी व लवकरात लवकर कठोर शिक्षा करावी अशी समस्त गडहिंग्लज जनतेची मागणी आहे.
गडहिंग्लजच्या वकील संघटनेलाही आमची विनंती आहे की या नराधम परप्रांतीयाची कोणीही केस घेवू नये. अशा लिंगपिसार नराधमाला अद्दल ही घडलीच पाहिजे व पिडीत मुलीला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळायलाच पाहिजे. तरच अशा वाईर घृणास्पद घटना भविष्यात घडणार नाहीत. म्हण्णून या निवेदनाद्वारे आम्ही गडहिंग्लजकर आपल्या तीर्व भावना व्यक्त करीत आहोत. कृपमा याची आपण दखल घ्यावी ही विनंती
यावेळी वैभव पाटील, सुमित चौगुले, स्वप्नील आजरी, रोहित जाधव, सार्थक देसाई, सूरज अस्वले, सौरभ खोत, नामदेव पोवार, प्रतीक रोटे याच बरोबर गडहिंग्लजकर नागरिक उपस्थित होते.