कोल्हापूर विमानतळावर बॉम्ब थ्रेट माँक एक्सरसाइज से संचलन करण्यात आले.

0 0

Share Now

Read Time:5 Minute, 15 Second

कोल्हापूर प्रतिनिधी, दि.२,बॉम्बची धमकी देऊन विघातक कारवाईची शक्यता विमान सेवेमध्ये येऊ शकते. 

अशा प्रसंगास तोंड देण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे विमानतळ सुरक्षा पथक व बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वाड तसेच अन्य पोलीस दल, कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दल तसेच इंटेलिजन्स ब्युरो आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे विमान वाहतूक नियंत्रण, संचार विभाग, अग्निशमन दल व सुरक्षा अधिकारी यांचे मधील समन्वयाची ही वार्षिक कवायत असते. ब्युरो ऑफ सिव्हिल एवियेशन सिक्युरिटी अर्थात नागरी विमान उड्डाण सुरक्षा ब्युरो यांचे निर्देशानुसार ही कवायत केली जाते. बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळताच बिल्डिंगच्या आत मधील सर्व उपस्थिताना सुरक्षित अशा असेंबली पॉईंट्स कडे जाण्याची सूचना देण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेक्युरिटी होल्ड मधील लोकांना एअरसाईड अर्थात विमाने उभे राहतात त्या ठिकाणच्या दूर अंतरावर एक असेंबली पॉईंट व इतरांसाठी विमानतळाबाहेरील दुसऱ्या असेंबली पॉईंट जवळ निर्देश फलक लावण्यात आले आहेत.

 

 आजच्या कवायतीमध्ये सूचना मिळाल्यापासून केवळ पंधरा मिनिटांमध्ये बॉम्ब डिटेक्शन पथक विमानतळावर हजर झाले. विमानतळाच्या ३९०० चौरस मीटर बिल्डिंग मधील कानाकोपऱ्यामध्ये शोध घेताना मात्र पुढील पंधरा मिनिटांमध्ये बॉम्बचे ठिकाण मिळवण्यामध्ये त्यांना यश आले. बॉम्ब चार प्रकारे विस्फोट घडवू शकतात. पोलीस दलाच्या बॉम्ब डिटेक्शन व डिस्पोजल स्क्वाड च्या जवानांनी अत्यंत शिताफीने व कुशलतेने बॉम्ब शोधून तो विस्फोट होण्याचे तंत्र किंवा बॉम्ब कशाप्रकारे विस्फोट होऊ शकतो याचा अंदाज बांधल्यानंतर सुरक्षितपणे बॉम्ब बिल्डिंग बाहेर काढून निष्प्रभ करण्यात आला. 

कोल्हापूर विमानतळ पोलीस सुरक्षा दलाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीमती स्नेहा गिरी यांचेमार्फत कंट्रोल रूम शी समन्वय करण्यात आला. सायबर सेल मार्फत धमकी देणाऱ्या मोबाईल नंबरचा देखील पत्ता प्राप्त करण्यास काही मिनिटांचा अवधी लागला त्याचे मार्फत धमकी देणाऱ्याचे लोकेशन देखील प्रस्थापित करण्यास मदत होते. धमकीचा कॉल देणाऱ्या व्यक्तीपर्यंत अविलंब पोहोचण्याची देखील कोल्हापूर पोलिसांची तयारी असते. 

अशा प्रकारची खोटी धमकी दिल्यास एफ आय आर दाखल करून त्या व्यक्तीविरुद्ध खटला भरण्याचे आदेश बीसीएएस मार्फत दिले गेले आहेत. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा ही आपल्या सुरक्षित प्रवासासाठी असून त्याबद्दल आवश्यक माहिती करून घेणे सामान्यांच्या हिताचे आहे व सुरक्षा तपासणीसाठी सहकार्य करावे हेच आजच्या काळात संयुक्तिक ठरते. 

कवायती मध्ये सुजित कुमार क्षीरसागर, पोलीस उपअधीक्षक (करवीर) तसेच बीडीडीएस चे श्री चौगुले, डॉग सिंबा व पथक, कमांडो फोर्स निकम व पथक, दहशतवाद विरोधी पथकाचे बाबर असे अधिकारी सहभागी झाले. भारतीय विमानतळ प्राधिकरण कोल्हापूर विमानतळ यांचे मार्फत मुख्य सुरक्षा अधिकारी जितेंद्र पचौरी यांनी कवायतीने संचलन केले.

उत्कृष्ट तंत्रज्ञान व तत्पर सेवा दल, सर्व विभागांमधील एकोपा व समन्वय याचे प्रदर्शन घडल्यामुळे विमानतळ सुरक्षा व कोल्हापुरातील जनसामान्य सुरक्षेची जिम्मेदारी कोल्हापूर पोलीस दल अत्यंत उत्कृष्टपणे निभावत आहे हेच सिद्ध झाले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *