विविध राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, साड्या आणि कपडे गांधी शिल्प बाजार प्रदर्शनाचे, -: खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन.

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 3 Second

कोल्हापूर दि.२९, केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय आणि हस्तकला विभागाच्यावतीनं, कोल्हापुरात गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला आणि हातमागावर बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरण्यात आलंय. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला.

४ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. कोल्हापूरवासियांनी या प्रदर्शनाला भेट देऊन हस्तकलेच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू खरेदी कराव्यात, असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं.

  केंद्र सरकारचं वस्त्र मंत्रालय आणि हस्तकला आयुक्त कार्यालयाच्यावतीनं कोल्हापुरातील राजारामपूरी जवळच्या भारत हौसिंग सोसायटीच्या सभागृहात प्रदर्शन भरवण्यात आलंय. 

४ फेब्रुवारी पर्यंत चालणार्‍या या प्रदर्शनात २९ राज्यातील ४० स्टॉल्स लावले आहेत. त्यामध्ये कोल्हापुरी चप्पल, वारली पेटींग, पैठणी, सोलापुरी चादर यांचे स्टॉल्स आहेत. त्याशिवाय आर्ट मेटल वेअर, बीडस क्राफ्ट, केन आणि बांबू उत्पादनं, कारपेट, शंख शिंपले, बाहुल्या आणि खेळणी, भरतकाम आणि क्रोशाच्या वस्तू, काच, गवत, पाने, वेळू आणि फायबरपासून बनवलेल्या वस्तू, साड्या, कपडे, स्कार्प, हस्तकलेच्या वस्तू इमिटेशन ज्वेलरी, तंजावर पेंटींग, लाकडी वस्तू, छत्तीसगडच्या डोकरा कास्टींगसह विविध राज्यातील वैशिष्टयपूर्ण वस्तू या प्रदर्शनात उपलब्ध आहेत.

खासदार धनंजय महाडिक यांनी प्रदर्शनातील सर्वच स्टॅालना भेट देऊन, कारागीर आणि विक्रेत्यांशी संवाद साधला. तसंच हस्तकलेच्या काही वस्तू खासदार महाडिक यांनी खरेदी केल्या.

देशभरातील कारागिरांना व्यासपीठ मिळावं, त्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी आणि कलेला चालना मिळावी, या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्तरावर गांधी शिल्प बाजार आणि हस्तशिल्प प्रदर्शन भरवण्यात येतंय. आगामी काळात कारागिरांसाठी क्लस्टर योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी नमूद केलं.

तसंच कारागीर पुरस्कार पुन्हा सुरु करण्याची सूचना खासदार महाडिक यांनी केली. खास सेलिब्रिटींसाठी बनवलेल्या आणि जीआय टॅग प्राप्त कोल्हापुरी चप्पलचं लाँचिंग, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं.

यावेळी वस्त्रोद्योगचे विभागाचे बसंतजी, हस्तकला विभागाचे सहाय्यक संचालक चंद्रशेखर सिंग यांनी मनोगत व्यक्त केलं. तर खादी ग्रामोद्योग विभागाचे यशोवर्धन बारामतीकर, राजेंद्र शिंदे, हस्तशिल्प संवर्धन अधिकारी आकाश मुळीक, अनिलकुमार बिंद यावेळी उपस्थित होते.

————————————————————-  जाहिरात  ————————————————————-

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *