पत्रकारितेत नाना पालकर यांचे योगदान महत्वाचे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी …

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 26 Second

कोल्हापूर – प्रतिनिधी कोल्हापुरातील पत्रकारितेमध्ये नाना पालकर याचे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन अधिविभागाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांना आदरांजली वाहिली.

 

ज्येष्ठ पत्रकार नुकमार ओतारी यावेळी ‘नाना पालकर यांची पत्रकारिता, या विषयावर ते बोलत होते.

ओतारी म्हणाले, नानांचा पत्रकारितेतील अनुभव पन्नास वर्षाहून अधिक होता. सुरवातीच्या काळात कोल्हापुरातील वर्तमानपत्रामध्ये सौन्दर्यप्रसाधनाच्या जाहिराती कंपन्या देत नव्हत्या. कोल्हापुरातील वर्तमानपत्रांना त्या जाहिराती मिळाव्यात याकरिता नाना पालकर यांनी कोल्हापूर विषयीची माहिती मुंबईतील जाहिरातदारांपर्यंत पोहचवली. कोल्हापूर आर्थिक दृष्ट्या समृद्ध असून या ठिकाणी सौंदर्यप्रसाधनाचा मोठा ग्राहक आहे, हे त्यांनी आकडेवारीसह कंपन्यांना पटवून दिले. याचा परिणाम म्हणून तत्कालीन सर्व वर्तमानपत्रांमध्ये सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिराती सुरू झाल्या. पत्रकार परिषदेला जाताना पत्रकारांनी गृहपाठ करूनच जावे, असा त्यांचा अट्टाहास होता. नाना स्वतः अभ्यास करून पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारत. पत्रकारांनी घटनेचा, संविधानाचा अभ्यास करावा, असाही नाना पालकर यांचा आग्रह होता.

कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांसाठी नाना पालकर यांनी लिखाण केले. त्यांनी दिल्ली येथेही चांगली पत्रकारिता केली. थेट प्रश्न विचारण्याकडे त्यांचा कल होता. अनेक राजकीय नेते त्यांच्या प्रश्नावर निरुत्तर होत असत. तरुण पत्रकारांना संधी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न होते. एखाद्या पत्रकाराने चांगली बातमी केली तर त्यांचं आवर्जून ते कौतुक करीत, असेही ओतारी यांनी सांगितले. राज्य शासनाच्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या संघटनेचे ते विभागीय अध्यक्ष होते.

नानापलकर यांनी पत्रकारांना पेन्शन मिळावी म्हणून मोठा संघर्ष केला; परंतु त्यांना स्वतःला या पेन्शनपासून वंचित राहावे लागले याची खंत वाटते, असेही ओतारी यांनीं नमूद केले.

  मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी शोकप्रस्ताव सादर केला.

यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी दिलीप मंडलिक, नाना पालकर त्यांच्या कुटुंबातील समीर मुन्शीपालकर, अमीर मुन्शीपालकर, तन्वीर मुन्शीपालकर, कबीर मुन्शीपालकर, हमीद मुन्शीपालकर, विशाल ओतारी , पत्रकारिता विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, ज्येष्ठ पत्रकार नवाब शेख, पत्रकार मिलिंद देसाई, भरत खानोलकर,शीतल बोंगाळे , माहिती अधिकारी वृषाली पाटील, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील, अनुप जत्राटकर, मतीन शेख, कोल्हापूर युवा पत्रकार संघाचे संघटक, डी. एस. कोंडेकर व विद्यार्थी उपस्थित होते.

———————————जाहिरात——————————-

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *