डॉ. शोभा चाळके साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित ….

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 27 Second

तासगाव (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका आणि श्री छत्रपती शहाजी महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. शोभा चाळके यांना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व साहित्यिक डॉ. माणिकराव साळुंखे, शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, ज्येष्ठ परिवर्तनवादी साहित्यिक डॉ. बाबुराव गुरव यांच्या हस्ते तासगाव, सांगली येथे पार पडलेल्या नवव्या प्रतिष्ठा साहित्य संमेलनात प्रतिष्ठा फौंडेशनचा साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. शोभा चाळके यांची आजवर सातहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील पंचवीसहून अधिक मानाचे, सन्मानाचे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. अनेक लघुपटाच्या कथा त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या संवाद प्रकाशन संस्थेच्या वतीने आजपर्यंत जवळपास एक हजार पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.

विविध 10 हुन अधिक साहित्य संमेलनांमध्ये प्रमुख संयोजक म्हणून सहभाग त्यांचा सहभाग राहिला आहे. वाचन चळवळ, मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, शैक्षणिक साहित्य वाटप चळवळीमध्येही त्यांचे दखलपात्र योगदान आहे. 

यावेळी प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव, ॲड. कृष्णा पाटील, प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, गझलकार मनिषा रायजादे, सरिता माने, प्रतिभा पैलवान यांच्यासह साहित्यिक विचारवंत उपस्थित होते.

_____________________जाहिरात ______________________

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *