Media control news network
पोलिसांची धडक मोहीम
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात व शहरात अमली पदार्थ (गांजा) विक्री करणाऱ्यांची शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गेल्या काही दिवसापासून छापा-सत्र सुरू असुन अनेक गांजा विक्रेते अमली पदार्थ विकणाऱ्यांना गजाआड करण्यास पोलिसांना यश आले आहे.
करवीर पोलीस ठाणे हद्दीतील पाडळी गांवचे हद्दीत असले संकल्प सिध्दी अपार्टमेंटच्या पश्चिम बाजुस असले मोकळ्या माळावरील एका पडक्या खोलीजवळ एक व्यक्ती गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी घेवुन जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी पथकातील पोहेकॉ पाटील यांना मिळाली त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, करवीर पोलीस ठाणे याच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक नाथा गळवे, तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार असे मिळाले बातमीच्या ठिकाणी संकल्प सिध्दी अपार्टमेंटच्या पश्चिमेस असले मोकळ्या माळावरील पडक्या खोली पाठीमागे आडोसा घेऊन सापळा लावला असता पडक्या खोलीजवळ थोड्या वेळांनी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून व्यक्तीस ताबेत घेऊन त्यास त्याचे नांव व पत्ता विचारता त्याने त्याचे नांव साजिद उर्फ फिरोज अल्लाबक्ष शेख असे सांगितले त्याचेकडे असलेली काळे रंगाची बँग चेक केली असता त्यामध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ असलेले दोन पुडे त्यातील एका पुड्यात १ किलो ५८५ ग्रॅम, दुसऱ्या पुड्यात २ किलो ५३८ ग्रॅम व एक पिशवी त्यात २१ ग्रॅम वजनाचा असा एकुण ४ किलो १४४ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळुन आलेने त्यास गांजासह ताबेत घेतले व त्यास गांजा कोणी पुरविला अधिक चौकशी केली असता त्याने आफताब अब्दुलकादर खान असे नाव सांगितलेने त्यास ही क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौकातुन शोध घेऊन ताबेत घेतले. कोर्टानी त्यास तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली सदर आरोपीकडून आणखीन साथीदार यांची नांवे निष्पन्न करून त्यांना अटक करून त्याचेकडुन आणखीन काही गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळतो का याबाबत त्याचेकडे अधिक तपास करण्यात येणार आहे.
____________________ जाहिरात ___________________