स्त्रीवादी दृष्टीकोनातून चित्रपटांचा अभ्यास होणे आवश्यक- डॉ.राजेंद्र गोणारकर…

सर्वच चित्रपट हे स्त्रीवादी असत नाहीत त्यामुळे स्त्रीवादी आकलन करून, महिला दृष्टीकोनातून श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील महिला व्यक्तिरेखांचा अभ्यास करणे अधिक उचित ठरेल, असे मत स्वामी रामानंद विद्यापीठाच्या माध्यम संकुलाचे संचालक प्रा.डॉ.राजेंद्र गोणारकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील महिला प्रतिमा’ या विषयावरील दोन दिवसांच्या राज्यस्तरीय सेमिनारच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना व्यक्त केले. अनेक चित्रपट ‘महिला केंद्रित’ असले तरीही महिला दृष्टीकोनातून चित्रपटांचा अभ्यास झाला पाहिजे कारण कोणत्याही सामाजिक व्यवस्थेचा पहिला बळी हा महिला असतात असेही डॉ. राजेंद्र गोणारकर पुढे आपल्या भाषणात म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राच्या संचालक प्रा.डॉ. निशा पुडे-पवार होत्या.

याप्रसंगी फिल्म इन्स्टिट्यूट,पुणे येथील डॉ.प्रसाद ठाकूर यांनी संशोधकांनी सादर केलेल्या वीस संशोधन पेपरचा आढावा घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.डॉ ठाकूर यांनी यावेळी संशोधकांनी चित्रपटांची पार्श्वभूमी,चित्रपट निर्मितीचे विविध घटक आणि ‘दृशात्मक साक्षरता’ याविषयी देखील अभ्यास केला पाहिजे,अस मत व्यक्त केले. चित्रपट समीक्षक सरफराज मुल्ला यांनी मार्दर्शन करतांना, श्याम बेनेगल यांनी आपल्या चित्रपटातून सामाजिक चौकटीतील महिलाच्या पांरपारीक प्रतिमा न मांडता ‘स्वत्वाचा शोध’ धेणाऱ्या ‘स्त्री प्रतिमा’ मांडल्या, असे मत व्यक्त केले, एमजीएम विद्यापिठाच्या डॉ विशाखा गारखेडकर यांनी श्याम बेनेगल यांच्या अंकुर ,निशांत,मंथन आणि भूमिका या चित्रपटातील ‘स्त्री प्रतिमांचा आढावा घेतला, सेमिनारचे सूत्रसंचलन संशोधक विध्यार्थिनी अश्विनी कांबळे यांनी केले .सेमिनारसाठी मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल प्रा.डॉ. निशा मुडे-पवार यांनी समाधान व्यक्त केले आणि लवकरच ‘श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील महिला प्रतिमा’या विषयावर संधोधन पेपर पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याचा स्त्री अभ्यास केंद्राचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisements

____________________जाहिरात______________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *