प्रेस क्लब आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक पोलिस व पत्रकार यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न.

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 31 Second

विशेष वृत्त : प्रेस क्लब आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, रायगड प्रेस क्लब अंतर्गत पनवेल तालुका प्रेस क्लबच्या वतीने आज  पोलिस त्याच बरोबर पत्रकार यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे,सुप्रसिद्ध नेत्रचिकिस्तक तथा मेडी. डायरेक्टर लक्ष्मी इन्स्टिट्यूट चे डॉक्टर सुहास हळदीपुरकर, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे,भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक नितीन पाटील उपस्थित होते.

वाहतूक पोलीस हे वर्षाचे बारा महिने अहोरात्र रस्त्यावर सेवा बजावत असतात.त्यांना स्वतःच्या प्रकृती कडे लक्ष देयला सुद्धा वेळ नसतो.तीच व्यथा ही समाजाचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार.त्यांना सुद्धा समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी या सर्वसामान्यान पर्यंत पोहोचवायच्या असतात.त्यांचं सुद्धा स्वतः हा कडे लक्ष देयला वेळ नसतो. याचेच औचित्त साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पनवेल तालुका प्रेस क्लब चा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे अशी प्रशंसा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.उन्हातानात काम करणारा वाहतूक पोलीस कर्मचारी हा नेहमीच दुर्लक्षित असतो.आणि त्याची काळजी पत्रकारांनी घेत अशा पद्धतीने उपक्रम राबवला त्याबद्दल पनवेल महापालिकेच्या आयुक्त मंगेश चितळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.वाहतूक पोलीस हे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता रस्त्यावरती काम राहतो आणि त्याची दखल प्रत्येक जण घेतो असं नाही पण ही दखल पनवेल प्रेस क्लब ने घेतली त्याबद्दल वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं.त्याच बरोबर नेत्र तपासणी शिबिराचा आयोजन केल्याबद्दल पोलीस आयुक्तांच्या तर्फे पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पनवेल तालुका प्रेस क्लब चे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सातत्याने असेच विविध कार्यक्रम प्रेस क्लबच्या माध्यमातून राबवण्याचा निर्धार या वेळी पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी वेळी व्यक्त केला.या वेळी मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टीकर,विभागीय सचिव,मराठी परिषद कोकण विभाग मनोज खांबे,अध्यक्ष रायगड प्रेस क्लब प्रशांत गोपाळे , रायगड प्रेस क्लब चे माजी अध्यक्ष विजय पवार, अनिल भोळे,भारत रांजणकर, पनवेल तालुका प्रेस क्लब च्या उपाध्यक्ष तृप्ती पालकर,सरचिटणीस स्वप्नील दुधारे,कार्यध्यक्ष राजेंद्र पाटील,खजिनदार दत्तात्रय कुलकर्णी,जेष्ठ पत्रकार गणेश कोळी,संजय कदम तसेच नितीन कोळी,राकेश पितळे,सनी पांडे आणि सचिन भोळे उपस्थित होते.

__________________जाहीरात ___________________

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *