१५ मे पासून कोल्हापूर ते नागपूर  विमानाचे होणार उड्डाण, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती..

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 13 Second

Media control news network

कोल्हापूर भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे कोल्हापूर जिल्ह्याचे विकास व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत नेहमीच प्रयत्नशील असतात. 

१५ मे पासून कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेला सुरूवात होत आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळं आता कोल्हापूर थेट राज्याच्या उपराजधानीशी हवाई मार्गे जोडलं जात आहे.

हे कोल्हापूर वाशियांसाठी अभिमानाची बाब आहे आठवडयातील पाच दिवस कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर विमानसेवा सुरू होत असून, स्टार एअरवेजच्या विमानात १२ बिझनेस क्लास आणि ६४ इकोनॉमी क्लास आसन व्यवस्था असेल. त्यामुळं कोल्हापूरच्या उद्योग, व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे.

कोल्हापूरचं विमानतळ आता नवनवीन भरारी घेवू लागले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्यानं कोल्हापूर विमानतळाचा विकास आणि विस्तार यासाठी प्रयत्न केले, केंद्र सरकार स्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळं धावपट्टी विस्तारीकरण, नाईट लॅण्डिंग, आधुनिक अग्निशमन वाहन, नवी टर्मिनल बिल्डिंग अशी कामे मार्गी लागली आहेत. विमानतळावरील भौतिक सुविधांसह विविध मार्गावर हवाई सेवा सुरू व्हावी, यासाठी खासदार महाडिक प्रयत्नशिल आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून आता कोल्हापूर ते नागपूर विमानसेवा सुरू होत आहे. १५ मे पासून मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार असे आठवडयातील पाच दिवस, स्टार एअरवेजकडून कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर विमानसेवा सुरू होत आहे. नागपूरहून सकाळी दहा वाजता विमान उड्डाण करेलकऔ आणि सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुरात येईल.

तर सकाळी बारा वाजता कोल्हापूरातून विमाँन उड्डाण करेल आणि दुपारी दीड वाजता हे विमान नागपूरमध्ये पोचेल. या विमानात बारा बिझनेस क्लास आणि ६४ इकोनॉमी क्लास आसने असतील. या नवीन विमानसेवेमुळं कोल्हापूरच्या व्यापार, उद्योग, पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

————————— जाहिरात ————————-

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *