कोल्हापूर/ प्रतिनिधी,भारतीय जनता पार्टीच्यावतीने गाव वस्ती संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी आज करवीर तालुक्यातील शिये गावाला भेट दिली. गावातील ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, शाळा, मंदिरे यांना भेट देवून, खासदार धनंजय महाडिक यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. आरोग्य केंद्रातील सुविधा वाढवू, गावच्या विकासासाठी भरीव निधी देवू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. दरम्यान सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह गावातील विविध लोकांची खासदार महाडिक यांनी भेट घेतली.
भाजपच्यावतीने गाव- वस्ती संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गेले दोन दिवस भाजपचे लोकप्रतिनिधी विविध गावांना भेटी देऊन तिथल्या कामकाजाचा आढावा घेत आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी आज करवीर तालुक्यातील शिये गावाला भेट दिली. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आणि जिल्हा संयोजक अक्षय पाटील यांनी खासदार महाडिक यांचे स्वागत केले.
यावेळी शिवाजी बुवा, विकास पाटील, विक्रम पाटील, भिकाजी जाधव, उत्तम गाडवे, मारुती बुवा, हणमंत पाटील, जयसिंग पाटील, बाबासो चव्हाण उपस्थित होते.
शिये गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार महाडिक यांनी पुष्पहार अर्पण केला. तर काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रध्दांजली वाहिली.
त्यानंतर खासदार महाडिक यांनी शिये ग्रामपंचायतीला भेट दिली. सरपंच शीतल कदम, उपसरपंच विलास गुरव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार महाडिक यांनी या अभियानाचा उद्देश स्पष्ट करून, ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी राजाराम सहकारी साखऱ कारखान्याचे संचालक विलास जाधव, किरण जाधव, नीलेश कांबळे, सुनील पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
या अभियानातून आज खासदार महाडिक यांनी शिये गावातील सर्वपक्षीय नेते मंडळींची भेट घेतली. त्यामध्ये ठाकरे सेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील यांचा समावेश होता.
दरम्यान अयोध्येमधील राम मंदिराच्या कारसेवकांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यामध्ये शिवाजी बुवा, आप्पासो पाटील, निवास पाटील, बाबासो चौगुले, शिवाजी पाटील, शिवाजी काशीद, बाबासो चव्हाण, भिकाजी जाधव यांना, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोटो देऊन सन्मानित करण्यात आले.त्यानंतर खासदार महाडिक यांनी संस्कार विद्यामंदिरला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांच्याबरोबर बुध्दिबळ खेळून त्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यानंतर शिये गावातील अंगणवाडीला भेट देऊन, कर्मचार्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
तसेच शिये गावातील शासकीय योजनांच्या काही लाभार्थ्यांशी खासदार धनंजय महाडिक यांनी चर्चा केली. तर शिये गावातील प्रसिध्द महादेव मंदिरालाही भेट दिली. इथेही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर शिये आरोग्य उपकेंद्राला भेट देवून वैद्यकीय अधिकारी डॉ. शोभा सूर्यवंशी यांच्याकडून आरोग्य सुविधांची माहिती, त्रुटी, कमतरता याबाबत माहिती जाणून घेतली.
याचबरोबर आशा सेविकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही दिली. यावेळी खासदार महाडिक यांच्या हस्ते आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच बांधकाम कामगारांना भांडी वाटप आणि उज्ज्वला गॅसचे वितरण करण्यात आले.
त्यानंतर खासदार महाडिक यांनी जैन बस्तीला भेट दिली. जैन समाजातील मुलींसाठी शासकीय योजनेतून सहकार्य करावे, अशी मागणी कुमार पाटील यांनी केली. यावेळी निखिल पाटील, योगेश पाटील, सुयश पाटील, दीपक पाटील, राजाराम कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब पाटील, पोपट खाडे, विशाल पाटील, गायत्री खुटाळे, कविता फडतारे, रेखा जाधव, रामचंद्र पाटील, नितीन जाधव, दीपक इंगवले यांच्यासह शिये, भुये, जठारवाडी इथले कार्यकर्ते उपस्थित होते.
————————- जाहिरात ————————-