Media control news network
माहिती अधिकार या माध्यमातून अनोख्या पद्धतीने माहिती मागणी अर्ज पत्राचे (सोशल मीडिया) या समाज माध्यमावर बनलाय चर्चेचा विषय.
जिल्हाधिकारी कार्यालयात शासनातर्फे काही दिवसापूर्वी घेण्यात आलेल्या संविधान हत्या दिवस हा कार्यक्रम संदर्भात एका व्यक्तीने अर्जावर त्याचे नाव आहे राजवैभव शोभा रामचंद्र या व्यक्तीने
जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर माहितीअधिकार, सरकारी अधिकाऱ्यांकडून चक्क अनोखी वाटणारी माहिती मागणीसाठी अर्ज केला आहे व त्या पोच अर्जाचे फोटोकॉपी समाज माध्यमावर पोस्ट केल्याने ती पोस्ट झपाट्याने समाज माध्यमातून फिरत आहे. सध्या हे पत्र सर्वत्र चर्चेचा विषय बनला असून राजवैभणे मागितलेली माहिती असे.,
१) संविधान जिवंत आहे की त्याचा मृत्यू झालाय?
२) मृत्यू झाला असेल तर त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवा.
३)मृत्यू झाला असेल तर तुम्ही लोक सरकारी अधिकारी पदावर आहात ते कोणत्या कायद्याने?
४) जिवंत असेल तर तुम्ही ‘संविधान हत्या दिवस’ असं कसं काय लिहिलं आहे?
५) १९७३ पासून ते आज अखेर माहिती मिळावी.
६) माहिती : व्यक्तीशा मिळावी
अशा पद्धतीने माहिती अधिकार अर्जाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात येथे माहिती मागवण्यात आली असून ते माहिती अधिकार /अधिकारी कुठल्या पद्धतीने माहिती देतात याकडे जनतेचे मात्र लक्ष लागून राहिले आहे.
————————– जाहिरात————————–