प्रतिनिधी प्रकाश कांबळे / अंबप ता हातकणंगले येथील बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अंबप गर्ल्स हायस्कूल मध्ये मातृ पितृ कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे टी करंबाळे सर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व पालकांचे विद्यार्थिनींनी औक्षण करून स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविक प्रसंगी बोलताना उत्तम पाटील सर म्हणाले की विद्यार्थ्यांना अतिप्रमाणात मोबाईल देऊ नका मोबाईलचे दुष्परिणाम हे वाईट आहेत त्याचबरोबर घरामध्ये होणारे संस्कार कसे होतात यावरही विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते अनेक मार्गाने मुले यशस्वी होतात त्यांच्या मनावर दडपण आणू नये त्याला अभ्यास करताना मोकळीक द्या त्याच बरोबर विद्यार्थ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे त्याला मनाला लागेल असे शब्द वापरू नयेत शेवटी म्हणाले की ज्यावेळी तुमचा पाल्य तुमचे चरण स्पर्श करतो त्यावेळी त्याला चांगली भावना प्राप्त होते हीच जीवनातील आदर्श भेट ठरणार आहे.
पत्रकार प्रकाश कांबळे म्हणाले की संस्कार शिबिरां अंतर्गत संपन्न झालेला मातृ-पितृ कृतज्ञता सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालक यांचे नाते अधिक दृढ बनते विद्यार्थ्याने आई-वडिलांचे चरण स्पर्श केल्यानंतर त्याच्या मनामध्ये जी जाणीव निर्माण होते ही भावना मनामध्ये यायला पाहिजे आपल्या मुलांची सर्व जबाबदारी शिक्षकावर न सोपवता आपणही आपल्या मुलाकडे लक्ष दिले पाहिजे.
मुख्याध्यापक जे टी करंबाळे सर म्हणाले की कुंभार जसा चिखलाला आकार देतोय तसंच आम्ही विद्यार्थ्याला आकार देण्याचे काम करतोय विद्यार्थ्यांच्या कडे पालकांनीही थोड लक्ष दिले पाहिजे गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे पहिले गुरू आहेत आई वडील आहेत आई माझा गुरु आई कल्पतरू, सौख्याचा सागरु आई माझी, प्रीतीचे माहेर अमृताची धार मांगल्याचे सार आई माझी या कवितेतुन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले यावेळी शिक्षक प्रताप पवार, पालक सौ शिवानी मोरे यांनी मनोगत व्यक्त केले ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थिनींनी आपल्या आई-वडिलांचे पाद्यपूजन केले व आशीर्वाद घेतला यावेळी सौ नसरीन शिकलगार मॅडम, सौ रंजना होलवान मॅडम, पद्मावती पाटील मॅडम, दरवाजकर मॅडम,बजरंग पाटील सर यांच्यासह पालक, शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता स्वागत व प्रस्ताविक उत्तम पाटील सर यांनी केले तर आभार सौ मीना चौगुले मॅडम यांनी मानले.
+–+—+—-+——+– जाहिरात–+—-+—+—+—+—–+