उत्तम कांबळे, राजीव आवळे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ जीवन गौरव पुरस्कार जाहीर 

1 0

Share Now

Read Time:2 Minute, 34 Second

Media control news network

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने लोकशाहीर अण्णा भाऊ यांच्या नावाने देण्यात येणारा मानाचा, सन्मानाचा, स्वाभिमानाचा व अभिमानाचा लोकशाहीर अण्णा भाऊ जीवन गौरव पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी नेते माजी आमदार राजीव आवळे यांना जाहीर झाला असून रविवार दि. 3 ऑगस्ट, रोजी दुपारी 12:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकशाहीर, सत्यशोधक, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या मानवतावादी विचारांना आदर्श मानून कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, राजकारण, समाजकारण आणि विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍यांना लोकशाहीर अण्णा भाऊ जीवन गौरव पुरस्कार देऊन दर वर्षी सन्मानित केले जाते.

या वर्षी उत्तम कांबळे, राजीव आवळे यांच्या समाजकारण व राजकारणातील महत्वपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांची निवड केली असून प्रा. किसनराव कुराडे, डॉ. श्रीपाद देसाई, प्रा. प्रकाश नाईक, डॉ. शोभा चाळके, अनिल म्हमाने, ॲड. करुणा विमल या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

पत्रकार परिषदेला विश्वासराव तरटे, सिकंदर तामगावे, अर्हंत मिणचेकर, गंगाधर म्हमाने, धम्मदीप मस्के, अनुराग शिंदे, आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर उपस्थित होते.

—————————जाहिरात—————————–

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *