Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:3 Minute, 45 Second
बीड दि.09 (प्रतिनिधी)ः– तालुक्यातील मौजे केंद्रीय जिल्हा परिषद शाळा गाढेपिंपळगाव व सिरसाळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा सिरसाळा, ता.परळी वै.जि.बीड दोन्ही शाळेमध्ये लाखो रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे निवेदन बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना आज परळी येथील शासकीय विश्रामगृह येथे देण्यात आले.

बीड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, परळी तालुक्यातील मौजे गाढेपिंपळगाव केंद्रीय प्राथमिक शाळा येथील पी.एम.श्री.योजनेअंतर्गत जो अनुदान आले आहे. त्यामध्ये मुख्याध्यापक अशोक घुगे यांनी शाळेच्या मैदानासाठी, झाडे लावा, शाळेची इमारत, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक विभाग नाही, विद्यार्थी व विद्यार्थीनीला गणवेश वाटप नाही, पिण्यासाठी पाणी आर.ओ.नाही, पाण्याची टाकी नाही. पोषण आहार नाही, सौर पॅनल नाही, शौचालय नाही. शाळेला संरक्षण भिंत नाही, विद्यार्थ्यांना पोषण आहारात अंडी, दुध, केळी तसेच पौष्टिक आहार दिला जात नाही. शाळेत फक्त खिचडी करतात पण खिचडी बनविण्यासाठी गॅस मंजूर असून देखील चुलीवर खिचडी शिजवली जाते. विद्यार्थ्यांना जेवणासाठी प्लेट नाहीत अशा पी.एम.श्री.केंद्रीय प्राथमिक शाळांना विविध योजना करण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान दिले मात्र मुख्याध्यापकांनी बहुतांश योजनेचा लाभ स्वतः घेतला. तब्बल सोळा महिने योजनेसाठी आलेले 3 लाख 39 हजार रूपयांचे अनुदान मुख्याध्यापक अशोक घुगे यांनी स्वतःच्या खात्यावर ठेवून भ्रष्टाचार केला आहे.
अशोक घुगे तीन महिन्यापुर्वी सेवानिवृत्त झाले आहेत तरी देखील त्याचा मुख्याध्यापक पदाचा चार्ज स्वतः सांभाळत होते. तसेच सिरसाळा येथील पी.एम.श्री.केंद्रीय शाळा मुख्याध्यापक खोडके मधुकर मेसाजी दोन्ही मुख्याध्यापक यांनी पी.एम.श्री.योजनेत भ्रष्टाचार केला आहे. अशा अनेक योजना विद्यार्थ्यांना दिल्या जात नाहीत. या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या अनुदानाचा लाभ मिळावा तसेच संबंधित दोन्ही मुख्यापकांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी पत्रकार बालकिशन सोनी, माणिक कोकाटे, प्रा.दशरथ रोडे, धिरज जंगले, बाबा शेख यांनी केली आहे.