Media control news network
मुंबई दि. ८, जनसुराज्य शक्ती पक्ष पश्चिम महाराष्ट्र मध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून महत्वपूर्ण ठरत असून अनेक पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिवसेंदिवस पक्षामध्ये प्रवेश करत असून जनस्वराज पक्षाचे ध्येय धोरण आणि सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनतेमध्ये विश्वासार्हता मध्ये वाढ होत आहे नागरिकांच्या मुंबई मंत्रालय विधान भवन मध्ये कामकाजाबाबत ये जा करणाऱ्या लोकांच्या व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सुलभतेसाठी पक्षाचे कार्यालय मुंबईमध्ये व्हावे यासाठी पदाधिकारी यांच्या आग्रहास गृहीत धरून संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकार यांनी आज दिनांक ८/७/२०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम सोहळा पार पडला.
कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी कार्यालयाची पाहणी करून कौतुक केले जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आगामी कार्ययोजनांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. राहुल नार्वेकरजी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,मंत्री अतुल सावे,मंत्री शिवेंद्रराजे भोसले,मंत्री हसन मुश्रीफ,खासदार धैर्यशील माने,
जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनयजी कोरे (सावकार ), आमदार, दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू), आमदार विश्वजीत कदम,आमदार सुधीर गाडगीळ,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा. समित कदम,जिल्हा बँकेचे संचालक विजयसिह माने,माजी सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
—————————जाहिरात——————————