कोल्हापूर, प्रतिनिधी. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबवली जात असलेली इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीला लांबणीवर पडली होती. पहिली यादी ३० जूनला जाहीर जाहीर होताच आपल्या पाल्याची प्रवेश निश्चित करण्यासाठी पालक धावपळ करत यादि परमाणे प्रत्येक महाविद्यालयात जाऊन अर्ज दाखल करत प्रवेश मिळवला
दहावीचा निकाल जाहीर होऊन दोन महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेल्याने अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना विवेकानंद ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर, यांचा २२ जुलै प्रवेशाचा पहिला दिवस ठरला स्वागत कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थी आणि पालकांना हजर राहण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या.
विवेकानंद कॉलेज येथे नवीन अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून वर्ग सुरू..
विवेकानंद कॉलेज येथे अकरावी सायन्स वर्गाचे वर्ग दिनांक २२ जुलै पासून सुरू करण्यात आले. नवीन प्रवेशित अकरावी विद्यार्थ्यांची स्वागत बैठक परिसरातील स्मृती भवन येथे घेण्यात आली.
बैठकीमध्ये विद्यार्थ्यांना ज्युनिअर सायन्स इन्चार्ज प्रा. एम. आर नवले यांनी कॉलेज विषयी माहिती सांगितली तसेच काही प्राधनितिक स्वरूपात पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
जेईई नीट प्रमुख प्रा. गुजर के. जे. यांनी संस्थेच्या डॉ बापूजी साळुंखे अकॅडमी बद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. प्रा. डॉ. ए. बी. पाटील यांनी सीईटी उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रा. सौ. गीतांजली साळुंखे यांनी कॉलेजचे शिस्त विषयक नियम व ड्रेस कोड यांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. प्रा, डॉ आर आर कुंभार उपस्थित होते. तर पालक प्रतिनिधी म्हणून विवेकानंद कॉलेजचे माजी प्रा. श्री. रानभरे सर, उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये कॉलेजची यशस्वी परंपरा विषद केली.
शेवटी स्टाफ सेक्रेटरी प्रा. एस.टी. शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. ए. पी. पाटील व प्रा. सौ. एस. ए. माने, केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. सुनील जगताप व प्रा. के. जे. शिंदे यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थी, स्टाफ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————— जाहिरात. ————————-